Skip to content

प्रधानमंत्री घरकुल योजना टप्पा -2 घरकुल मजूरीपत्र वितरण कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात खैरी-बिजेवाडा येथे संपन्न झाला.
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा.ना.श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब मंत्री, महसूल महा राज्य, पालकमंत्री, नागपूर जिल्हा तथा प्रदेशाध्यक्ष भाजपा, महाराष्ट्र यांच्या संकल्पनेनुसार भारतात राहणाऱ्या प्रत्येक गरीब व्यक्तीला घरकुलचा लाभ देण्याचे कार्य राज्यशासनाच्या कार्यक्रमामार्फत योजनेतील मंजूर लाभार्थ्यांना घरकुलचे प्रमाणपत्र देण्यात आले.

रणवीर सोहनलालजी यादव सरपंच, ग्रामपंचायत खैरी-बिजेवाडा तथा संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, रामटेक यांच्या हस्ते खैरी-बिजेवाडा अंतर्गत प्रधानमंत्री घरकुल योजना एकूण लाभार्थी-132,मोदी आवास योजना- 08,रमाई घरकुल योजना-23,शबरी आवास योजना-20 लाभार्थींना घरकुल मंजूरी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.


सदर कार्यक्रमाला श्री.उदयसिंग सोहनलाल यादव महामंत्री भारतीय जनता पार्टी जिल्हा नागपूर ग्रामीण,श्री.रणवीर सोहनलाल यादव,सरपंच श्री. अभिषेक रौतेल उपसरपंच,ग्रा.प.सदस्य,
सौ. संघमित्रा अंबादे,ग्रामपंचायत अधिकारी श्री.लीलाधर सोनवाणे, श्री.प्रयास ठवरे,श्री.धर्मेंद्र शुक्ला,श्री.शैलेश खोब्रागडे, श्री.कैलासअडमाची, श्री.नरसिंग गुडी रोजगार सेवक,आणि समस्त ग्रामपंचायत खैरी बिजेवाडा चे कर्मचारी व ग्रामपंचायत खैरी बिजेवाडा चे सर्व लाभार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!